शांततामय सहजीवनासाठी लोकशाही आघाडी
About
शांततामय सहजीवनासाठी लोकशाही आघाडी

Lokshahi Aghadi Karad

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार व देशाचे माजी उपपंतप्रधान स्व. यशवंतरावजी चव्हाणसाहेब यांची कर्मभूमी असलेले कराड शहरास ऐतिहासिक व राजकीय वारसा लाभल्याने त्यास नावलौकिक प्राप्त महत्त्व प्राप्त झालेले आहे. आधुनिक कराड नगरीचे शिल्पकार आदरणीय स्व. पी. डी. पाटीलसाहेब यांनी सलग 42 वर्षे या नगरीचे नगराध्यक्षपद भूषविले व नगरीचा चौफेर विकास केला. आदरणीय पी. डी. पाटीलसाहेब यांच्या काळात झालेली नगरपरिषदेची भव्य व देखणी इमारत, शहरास शुद्ध व मुबलक पिण्याचे पाणी, भव्य स्टेडियम, भुयारी गटार योजना, सांडपाण्याची जलनिःसारण योजना आदी राज्यातील अनेक मोठ्या शहरात उपलब्ध नव्हत्या त्या नागरी सुविधा आदरणीय पी. डी. पाटीलसाहेबांनी नागरिकांना उपलब्ध करून दिल्या त्यामुळे या शहरास नावलौकिक प्राप्त झालेला आहे. वरील नागरी सुविधांमुळे राज्यात नागरी स्वच्छता अभियानामध्ये देखील कराड शहराचा नेहमी वरचा क्रमांक राहिलेला आहे. अशा या कराड शहरात लोकशाही आघाडी कराड शहर या आघाडीची स्थापना नोव्हेंबर 2006 मध्ये करण्यात आली. या आघाडीने आदरणीय पी. डी. पाटीलसाहेब यांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार स्थापनेपासून आजपर्यंतची वाटचाल सुरू आहे. आघाडीची स्थापना माजी मंत्री मा. श्री. बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मा. श्री. सुभाष पांडुरंग पाटील यांनी केली आहे.

Shape Shape

Our Objectives

  • कराड तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणूका कायद्यानुसार तयार झालेल्या संविधानावर दृढविश्वास व निष्ठा ठेवून त्यातील सर्व तरतूदीचे सन्मानपूर्वक पालन करुन लढविणे.
  • समाजवाद, धर्मनिरपेक्षता व लोकशाही या तत्वाचे विशेष लक्ष देऊन व या तत्वांचे पालन करुन कराड नगरपरिषदेची निवडणूक लढविणे.
  • कराड तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक भारताची प्रभुत्वसंपन्नता, एकता व एकात्मता सन्मानपूर्वक मान्य करुन व त्यास पोषक राहील अशा पध्दतीने लढविणे.
  • कराड तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीसाठी उमेदवारांची निवड करणे व निवडलेल्या उमेदवारांना आघाडीतर्फे पुरस्कृत करणे.
  • कराड तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीचे वेळी जाहीर केलेल्या कार्यक्रमाची / जाहीरनाम्यातील कार्याची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करणे.
  • आघाडीतर्फे पुरस्कृत केलेल्या व निवडून आलेल्या सदस्यांनी आघाडीचे सदस्य म्हणून कराड तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ( नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत ) आघाडीच्या उद्देश पूर्तीसाठी एकमताने प्रयत्न करणे व तसा प्रयत्न होत आहे याकडे लक्ष ठेवणे.
  • कराड तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विविध सभापती निवड तसेच नामनिर्देशित सदस्य यांची निवड करणे संबंधी निवडणूक लढविणे.
  • आघाडीतील निवडून आलेल्या सदस्यांशी विचार-विनिमय करून कराड तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विविध सभागृहातील आघाडीच्या नेत्याची निवड करणे.
  • कराड तालुका व परिसरामध्ये सामाजिक, राजकीय प्रश्नांबाबत मोर्चा काढून, घेराव करुन अथवा अन्य मार्गाने निदर्शने करणे तसेच अशा बाबतीतील घटनेबाबत जरुर तर निषेध करणे.